Loksabha Election 2024 : महायुतीत बंडाची ठिणगी? नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि त्यानंतर...

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यातील काही महत्त्वाच्या जागांचा तिढा सुटला असला तरीही पक्षांतर्गत असंतोष लपून राहिलेला नाही.   

योगेश खरे | Updated: Apr 2, 2024, 09:53 AM IST
Loksabha Election 2024 : महायुतीत बंडाची ठिणगी? नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि त्यानंतर...  title=
Loksabha Election 2024 hemant Godse demands nashik constituency seat over chagan bhujbal

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : (Loksabha Election 2024) महायुतीमध्ये (Nashik) नाशिक, धाराशिव, रत्नागिरी- सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजी नगरल या मतदार संघांतील जागांसाठीचा तिछा सुटत नसतानाच एक दिलासायाक बातमी समोर आली. ज्यामध्ये नाशिक आणि धाराशिवच्या जागा राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचं स्पष्ट झालं. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्यानंतर याच जागेवरून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. 

दरम्यान, महायुतीतील नाशिकचा उमेदवार बदलण्याच्या चर्चांनी जोर धरला. याच चर्चांदरम्यान खासदार हेमंत गोडसे तिसऱ्यांदा मुंबईमध्ये उशिरा रात्री रवाना झाले. मंगळवारी सकाळी 11 वाजता वर्षा बंगल्यावर जाऊन ते आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज तर आता राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत असल्याने गोडसेंनी नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं गेलं. 

हेसुद्धा वाचा : अवघ्या साडेपाच तासांत गाठा अयोध्या; महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू, किंमत किती माहितीये? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत आल्याचं वक्तव्य ते वारंवार सांगत तिकीट मिळण्याबाबत अस्वस्थ होते. मात्र सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या तिकीट कापण्याची चर्चा वाढत असल्याने आज पुन्हा ते उमेदवारी जाहीर करण्याबाबत गळ घालणार आहेत. मराठा उमेदवार म्हणून त्यांनी यापूर्वी लोकसभेच्या रिंगणात समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांना पराभूत केलं आहे. भुजबळ यांना तिकीट मिळाल्यास त्यांच्यासाठी हे मानहानिकारक असणार आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांकडून त्यांना काय आश्वासन मिळतं आणि तिकीट न मिळाल्यास ते बंड करणार का याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x