भाजपच्या मेघना बोर्डीकर नाराज, शिवसेनेची शिष्टाई निष्फळ

भाजपच्या महिला प्रदेश कार्यकारणी सदस्या मेघना बोर्डीकरांची नाराजी कायम आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेत्यांनी बैठक घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली.  

Updated: Mar 20, 2019, 09:43 PM IST
भाजपच्या मेघना बोर्डीकर नाराज, शिवसेनेची शिष्टाई निष्फळ title=

परभणी : भाजपच्या महिला प्रदेश कार्यकारणी सदस्या मेघना बोर्डीकरांची नाराजी कायम आहे. बोर्डीकर परभणी लोकसभा लढविण्यासाठी इच्छूक असून गेल्या तीन वर्षांपासून त्या लोकसभेची तयारी करत आहे. मात्र युतीच्या वाटाघाटीत परभणीची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. इथून शिवसेनेचे संजय जाधव हे विद्यमान खासदार आहेत. युती झाली असताना मेघना बोर्डीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर थेट शिवसेनेला फटका बसणार आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेत्यांनी बैठक घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली. पुढील चर्चेसाठी २२ मार्चला मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे.

परभणीत भाजपच्या मेघना बोर्डीकर मोठा निर्णय घेणार होत्या. त्या बंडखोरी करून लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत होत्या. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी युतीकडून प्रयत्न झाले.  मेघना बोर्डीकर नाराज असल्याने वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना खासदार संजय जाधव, परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी युतीच्या बैठकीचे आयोजन केले. यावेळी त्याही उपस्थित होत्या. परभणी शहरातील बोर्डीकरांच्या निवासस्थानी बैठक झाली या बैठकीनंतर मेघना बोर्डीकर आपल्या निर्णयवार ठाम राहिल्या. दरम्यान, संजय जाधव युतीचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात मेघना बोर्डीकर रिंगणात उतरल्या तर मोठा पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढू शकते. ही शक्यता घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलावून घेतले आहे.