मोलकरणीने मारला आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला

जर तुम्ही घरात मोलकरीण ठेवत असाल तर सावधना कारण मोलकरणी तुमच्या आयुष्याच्या पुंजीवर डल्ला मारू शकते 

Updated: Aug 3, 2017, 09:42 PM IST
मोलकरणीने मारला आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला title=

सिंधुदूर्ग : जर तुम्ही घरात मोलकरीण ठेवत असाल तर सावधना कारण मोलकरणी तुमच्या आयुष्याच्या पुंजीवर डल्ला मारू शकते आणि असाच एक प्रकार रत्नागिरीत घडलाय. रत्नागिरी शहर बसस्थानकासमोर राहणा-या निवृत्त शिक्षिका अंजना दत्तात्रय गुणे यांना घरात मोलकरीण कामाला ठेवल्याचा फटका चांगलाच बसला.

कारण 15 दिवसांपूर्वी कामाला ठेवलेल्या मोलकरणीनेच घरातील आयुष्यभराच्या पुंजीवर डल्ला मारला.अंजना गुणे हे आपल्या एका नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसासाठी निघाल्या होत्या त्यावेळी त्यांनी दागिने काढण्यासाठी कपाट उघडलं त्यावेळी कपाटातील दागिने आणि रोख रक्कम गायब झाल्याचं निदर्शनास आलं. 

त्यांनी थेट रत्नागिरी शहर पोलीसात तक्रार दिली आणि पोलीसांनी तपास सुरू केला आणि घरात मोलकरणीचं काम करणा-या दर्शना दिपक कदम या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे, विशेष म्हणजे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी हा प्रताप या मोलकरणीने केल्याचं उघड झालं आहे.