Mhada Pune Lottery 2023 : म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीच्या सोडतची तारीख अखेर जाहीर झाली आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेतील 5863 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात आली आहे. या लॉटरीत कुणाच नशिब चमकणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.
म्हाडा पुणे मंडळाच्या 5863 घरांच्या लॉटरीची सोडत 5 डिसेंबर रोजी होणार आहे. पुणे जिल्हा परिषद सभागृहात ही सोडत काढली जाणार आहे. या सोडवेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढली जाणार आहे.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 5 सप्टेंबर 2023 रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला होता. या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 5863 सदनिकांसाठी सुमारे 60,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. अधिवास प्रमाणपत्र तसेच इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांनी वाढीव मुदत मागितली होती. अर्जदारांच्या मागणीनुसार नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी मंडळातर्फे सोडतीसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील 5425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील 69 सदनिका, सांगली जिल्ह्यातील 32 सदनिका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 सदनिका तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
AUS
(27 ov) 95/6 (70.3 ov) 225
|
VS |
WI
143(52.1 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.