Maha Vikas Aghadi : राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा, पहिल्या सभेचा टीझर जारी

Maha Vikas Aghadi : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. येथे आघाडीचा प्रयोग झाला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्याने भाजपविरोधात राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या संयुक्त पहिल्या सभेचा टीझर जारी करण्यात आलाय. आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

Updated: Mar 28, 2023, 11:48 AM IST
Maha Vikas Aghadi : राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा, पहिल्या सभेचा टीझर जारी title=

Maha Vikas Aghadi : राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले होते. 'वज्रमूठ महाविकास आघाडीची' असा महाविकास आघाडीचा टीझर जारी करण्यात आला आहे. 2 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पहिल्या सभेचा टीझर जारी करण्यात आलाय. महाविकास आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

या महाविकास आघाडीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले या सभेला संबोधित करतील. औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर महाविकास आघाडीची पहिली सभा होत आहे. यासभेत कोण काय बोलणार याची उत्सुकता आहे.

पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. येथे आघाडीचा प्रयोग झाला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्याने भाजपविरोधात राज्यात महाविकास आघाडी उभी राहिली आहे. तसेच, शिवेसना फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे सक्रीय झाले आहेत. ठाकरे यांच्या महाराष्ट्रात मॅरेथॉन जाहीर सभा होत आहे. कोकणात खेडनंतर मालेगाव येथे मोठ्या गर्दीच्या जाहीर सभा झाल्या होत्या. त्यामुळे ठाकरे गटात चैतन्य आहे. आता छत्रपती संभाजीनंगर येथे पहिलीच सभा महाविकास आघाडीची होते आहे.

दरम्यान, कोल्हापूर, पुणे , मुंबई, नाशिक, कोल्हापूर, अमरावती या ठिकाणी कार्यक्रमाच्या तारखा जाहीर होणार आहेत एप्रिल महिन्याच्या 2 तारखेपासून सगळ्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्ररित्या 10 जूनपर्यंत महाविकास आघाडीच्या सभा एकत्र घेण्याचा निर्णय झालेला आहे. यामध्ये शरद पवार  उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, जयंत पाटील इत्यादी नेते उपस्थित असतील, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  यांनी दिली.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होणार आहेत. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत.  एप्रिल - मे महिन्यात प्रत्येक जिल्हात महाविकास आघाडीच्या एकत्र सभा होणार आहेत. नागपूर, पुणे, कोल्हापूर येथे प्रामुख्याने सभा होणार आहेत. उदधव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यासह प्रमुख नेते सभेला उपस्थितीत राहणार आहेत.