मुंबई : महाड इमारत दुर्घटनेतून वाचलेल्या चार वर्षीय मोहम्मद नौसीन बांगी आणि ५ वर्षीय अहमद हशीम शेकनाग या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च एकनाथ शिंदे उचलणार असून निवासी शाळेत त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. मोहम्मद आणि अहमद यांना मंगळवारी ढिगाऱ्याखालून काढण्यात आलं.
मोहम्मदचे आई आणि दोन बहिणींचा या इमारतीच्या दुर्घटनेत मृत्यू झाला तर अहमदचे आई वडीलांचा देखील दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. महाडमधील काजळपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या इमारतीचं नाव आहे. या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं ही इमारत कोसळल्यानंतर परिसरात एकच हाहाकार माजल्याचं पाहायला मिळालं. या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखालून जवळपास ६० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
महाडमधील काजळपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या इमारतीचं नाव आहे. या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं ही इमारत कोसळल्यानंतर परिसरात एकच हाहाकार माजल्याचं पाहायला मिळालं. या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखालून जवळपास ६० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
४० तासाचं रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर महिलेचा शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आज दिवसभर मलबा हटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.