Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. सोमवारी ठाणे शहर मतदारसंघाचे मनसे उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी घेतलेल्या जाहीर सभेत शिवसेना आणि धनुष्यबाणावरील मालकीसंदर्भात केलेल्या विधानावरुन राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंनी पक्ष आणि चिन्हाचा उल्लेख पॉपर्टी असा करत जाहीर सभेत केलेल्या विधानावरुन, 'राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे कधीच माफ करणार नाही', असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
"शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माझे शरद पवारांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत, पण तरीही एक गोष्ट सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे ती अजित पवारांची नाही," असं विधान राज ठाकरेंनी आपल्या ठाण्यातील जाहीर भाषणात केलं होतं.
याचसंदर्भात संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी, "आम्ही काय बोलत होतो इतके दिवस? आम्ही काय वेगळं सांगत होतो का?" असा प्रतिप्रश्न केला. "बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी आहे आणि शरद पवारांचीच प्रॉपर्टी आहे शरद पवारांच्या हयातीत ती अजित पवारांना देणारं निवडणूक आयोग कोण? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी संपत्ती आहे, जनता, शिवसैनिक, शिवसेना, धनुष्यबाण ही एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी-शाह कोण? हाच तर आमचा सवाल आहे. त्याच मोदी-शाहांची तळी आज आमचे राज ठाकरे उचलत आहेत. मुळात त्यांचा हल्ला मोदी शहांवर पाहिजे. त्यांनी गॅलरीत बघून बोलू नये. सभागृहात, मुख्य मैदानात काय चाललं आहे ते पहावं," असा टोला राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला.
नक्की पाहा >> ...अन् सतेज पाटील कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले! कोल्हापूरमधील राड्यानंतरचा Video पाहाच
"बाळासाहेबांची ही प्रॉपर्टी गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी एकनाथ शिंदेंना परस्पर दिली. जशी मुंबई पोर्तुगिजांनी ब्रिटीशांना दिली आहेर म्हणून. त्याच पद्धतीने मोदी-शाहांनी बाळासाहेबांची शिवसेना आहेर म्हणून दिली. शिवसेना काय मोदी-शाहांच्या घरात निर्माण झाली होती का? ती शिंद्यांना दिली त्यांनी! राज ठाकरेंनी यावर बोललं पाहिजे. बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे हे सांगण्याची गरज नाही. त्यासाठी राज ठाकरेंच्या प्रमाणपत्राची गरज नाही. शिवसेना कोणाची हे देशाच्या जनतेला माहिती आहे. आज तुम्ही ज्यांचा प्रचार करता, ज्यांना आपले नेते मानता त्यामध्ये फडणवीस, अमित शाह, प्रधानमंत्री मोदीजी त्यांनी ही बाळासाहेबांची, महाराष्ट्राच्या जनतेची प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेंना दिली आहे. त्या भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आपण महाराष्ट्रात करायला निघाला आहात. यासारखं पाप नाही. बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत," असंही राऊत म्हणाले नाहीत.
नक्की वाचा >> माघार, बाचाबाची, रडारड... आता कोल्हापूर उत्तरमध्ये पुढे काय? सतेज पाटील हसत म्हणाले, 'छत्रपती शाहू...'
त्यांना काय आम्ही ट्रॅब्युलन नेमलं आहे का? तुम्ही निर्णय घ्या म्हणून. ही शिंदेंची प्रॉपर्टी नाही. ती प्रॉपर्टी ज्या मोदी शाहाच्या तुम्ही आज पालख्या वाहता त्यांचीही नव्हती ना! बाळासाहेबांनी ती उद्धव ठाकरेंकडे सोपवली होती. शरद पवार हयात असताना मोदी शहांनी ती अजित पवारांना दिली. ती काही मोदी-शाहांची प्रॉपर्टी नव्हती ना? राज ठाकरे मूळ मुद्दा सोडून बोलत आहेत ते काय बोलत आहेत त्यावर महाराष्ट्र चालत नाही. महाराष्ट्रात त्यांना भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि तो महाराष्ट्राचा शत्रू आहे