महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीर

Third Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.  

वनिता कांबळे | Updated: Oct 21, 2024, 04:37 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीर title=

Maharashtra Assembly Elections 2024 :  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने 99 उमेदवारांची पहिली याची जाहीर केली आहे. ही यादी जाहीप झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यानंतर आता  परिवर्तन महाशक्तीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  

विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी म्हणून परिवर्तन महाशक्ती रिंगणात उतरली आहे.. परिवर्तन महाशक्ती राज्यातील 150 मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत. यामधील पहिली 8 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आलीये..परिवर्तनच्या पहिल्या यादीत अचलपूर मतदारसंघातून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना तर स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चपट यांना राजुरा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलीये.

सोबतच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीये.. तर शिरोळ आणि मिरज या जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्या.. राजू शेट्टी हे कार्यकर्त्याशी चर्चा करुन या दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर करणार आहेत..

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x