तुळजाभवानीनंतर आता रांजणगाव मंदिरातही तोकड्या कपड्यांना बंदी, देवस्थानचा महत्त्वाचा निर्णय

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरापाठोपाठ आता अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरातही तोडक्या कपडे घालून येणाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Updated: May 18, 2023, 04:57 PM IST
तुळजाभवानीनंतर आता रांजणगाव मंदिरातही तोकड्या कपड्यांना बंदी, देवस्थानचा महत्त्वाचा निर्णय title=

हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरुर : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव मंदिर (Ranjangaon Temple) व्यवस्थापणाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महागणपती रांजणगाव मंदिरात अंग प्रदर्शक, असभ्य आणि अशोभनीय वस्र तसंच हाफ पँन्ट आणि बर्मुडा (Wester Dress) घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. रांजणगाव देवस्थान ट्रस्ट च्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थान ट्रस्ट कडून यासबंधीचे परिपत्रक काढण्यात आलं आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर (Shri Tuljabhavani Temple) व्यवस्थापनानेही मंदिरात वेस्टर्न कपडे (Western Dress) घालणाऱ्यांना नो एन्ट्री अर्थात प्रवेश बंदी केली आहे. आई तुळजाभवानी मंदिरात यापुढे हाफ पॅन्ट, बर्मुडा असे वेस्टर्न कपडे घालणाऱ्या भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांचेवतीने अशा सूचनांचे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.