कोल्हापुरात खाजगी गाड्यांची तोडफोड, इंटरनेट सेवा बंद

सकाळपासून शांततेनं सुरु असलेल्या आंदोलनानं कोल्हापुरात दुपारी हिंसक वळण घेतलं.

Updated: Jan 3, 2018, 02:48 PM IST
कोल्हापुरात खाजगी गाड्यांची तोडफोड, इंटरनेट सेवा बंद  title=

कोल्हापूर : सकाळपासून शांततेनं सुरु असलेल्या आंदोलनानं कोल्हापुरात दुपारी हिंसक वळण घेतलं.

भीम सैनिकांचं आंदोलन शांततेत सुरू असतानाच काही अज्ञातांनी घोळक्यानं या आंदोलनात घुसून खाजगी गाड्यांचा चक्काचूर केला.

धक्कादायक म्हणजे, जिथे ही घटना घडली तिथून हाकेच्या अंतरावर पोलीस उभे होते परंतु, त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे ही परिस्थिती हाताळण्यास पोलीस अपयशी ठरलेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

सोशल मीडियाद्वारे अफवा पसरण्याची शक्यता असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. 

शाहू महाराजांच्या नगरीत विचारांची लढाई विचारानेच लढली जायला हवी होती पण तसं झालं नाही मुद्यावरची लढाई गुद्यावर गेली, अशा शब्दांत नागरिक आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.