Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला. मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर, काही चेहरे हे जुन्याच मंत्रिमंडळातील आहे. मंत्रिमंडळा विस्तारानंतर तिन्ही पक्षात नाराजीनाट्य असल्याचे समोर आले आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काही नेते नाराज असल्याचे बोललं जातंय. काहींनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. भाजपचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही मंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे.
'मी मुख्यमंत्री असतो तर नांदेडला मंत्रिपद देण्याबाबत मी विचार केला असता. पण मी मुख्यमंत्री नाही त्यामुळे सांगता येत नाही,' असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे. चव्हाणांच्या या प्रतिक्रियेमुळं नांदेडला एकही मंत्रिपद मिळालं नसल्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.
'नांदेड जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळाले नाही. पुढील अडीज वर्षांनतर तरी नांदेडला मंत्रिपद मिळेल का असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. पहिले अडीच वर्ष आणि त्यानंतर अडीच वर्ष इतरांना मंत्रिपद असे दिसत असल्याने महाराष्ट्राला बॅलन्स टीम फडणवीस यांच्या नेतृत्वात मिळेल. यावेळेस परभणी, बीडला संधी मिळाली आम्हाला त्याचा आनंद आहे. नांदेडलाही भविष्यात मिळेलच,' असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
ठाणे - कोकणातील ८ मंत्र्यांचा सावेश
पश्चिम महाराष्ट्रातील १० मंत्र्यांचा समावेश
मराठवाडा - ६ मंत्र्यांचा समावेश
मुंबईतील २ मंत्र्यांचा समावेश
विदर्भातील ९ मंत्र्यांचा समावेश
उत्तर महाराष्ट्रातील ७ मंत्र्यांचा समावेश
स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात नागपुरात दोनच वेळेला शपथविधी सोहळा पार पडला आहे.
1) 21 डिसेंबर 1991 मध्ये सुधाकर राव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा...
२) आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा..
मात्र महाराष्ट्राच्या निर्मिती पूर्वी म्हणजेच 1952 मध्ये वसंतराव नाईक यांचा नागपूर येथे तत्कालीन मध्य प्रांत च्या सरकारमध्ये उपमंत्री म्हणून छोटा शपथविधी सोहळा पार पडला होता. म्हणजेच नागपुरातला हा तिसरा मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा आहे.. तर 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतरचा दुसरा शपथविधी सोहळा आहे.