तळीरामांसाठी मोठी बातमी, परदेशी मद्यावर राज्य सरकारचा हा मोठा निर्णय

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी, परदेशी मद्यावर राज्य सरकारचा हा मोठा निर्णय 

Updated: Nov 20, 2021, 10:31 PM IST
तळीरामांसाठी मोठी बातमी, परदेशी मद्यावर राज्य सरकारचा हा मोठा निर्णय  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: मद्यप्रेमींसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बनावट मद्यविक्रीवर आळा बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे परदेशी मद्य घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

परदेशातून आयत होणाऱ्या मद्याचे दर आता कमी होणार आहे. कोरोना काळात मद्याचे दर जास्त होते. मात्र आता हे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  परदेशातून आयात होणाऱ्या मद्यावरील विशेष शुल्काच्या दरात कपात करण्याचा निर्णय  राज्य सरकारने घेतला आहे. 

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बनावट मद्यविक्रीवर आळा येईल असं सांगण्यात येत आहे. आयात मद्यावरील विशेष शुल्क ३०० टक्क्यावरून १५० टक्क्यांवर करण्यात आले आहेत.

इतर राज्यात हे शुल्क अत्यंत कमी असल्याने आपल्या राज्यातील विशेष शुल्कात कपात करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील परदेशी मद्याचे दर इतर राज्याच्या बरोबरीने होतील. 

या निर्णयामुळे मद्य तस्करीला आळा बसेल असा राज्य सरकारला विश्वास आहे. दर कमी झाल्याने बनावट मद्याला आळा बसेल. सध्या या विशेष शुल्कातून राज्याला १०० कोटी वार्षिक महसूल मिळतो, हा महसूल दुप्पट होईल असा राज्य सरकारचा अंदाज आहे.