राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर

राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.

Updated: Aug 6, 2018, 08:03 PM IST

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. आज मुंबईत झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत संपावर जाण्याच्या इशाऱ्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्यापासून 17 लाख कर्मचारी संपावर जात आहेत. संपावर जाणाऱ्यांमध्ये मंत्रालयातील कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे सर्वच जण सहभागी आहेत.