पुणे : impose presidential rule : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावरुन कलम लावलं जाईल पण ते न्यायालयात टिकणार नाही, असे घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी स्थिती नाही, लागली तरी सरकार न्यायालयात जाईल, असे बापट म्हणाले. (Maharashtra is not in a position to impose presidential rule - Ulhas Bapat)
राज ठाकरे फक्त गर्दी जमा करतात ती गर्दी जमा करणे कोणत्या राजकीय पक्षाला न परवडणार आहे. कितेक वेळा कलम आधी ठरवलं जात आणि मग गुन्हे दाखल केला जातो. राज ठाकरे यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवं. जेवढे लोक येतात तेवढं राजकीय वजन वाढले जाते. राज ठाकरे यांच्या भाषणावरुन कलम लावलं जाईल पण ते न्यायालयात टिकणार नाही, असे बापट म्हणाले.
राज्य ठाकरे यांची काही वाक्य जिथावणी देणारी आहेत. कायदा सगळ्याना सारखा आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी स्थिती नाही आणि लागली तरी सरकार न्यायालयात जाईल, असे ते म्हणाले.