मुंबई : महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, तसंच कोरोना चाचणी करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. ट्विटरद्वारे आदित्य ठाकरेंनी ही माहिती दिली आहे.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 20, 2021
आदित्य ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. आपण सर्वांनी मास्क घालावा, आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, अशी विनंती आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला केली आहे.