नागपूर की वासेपूर...शुल्लक कारणावरुन गुंडांचा दोघांवर जीवघेणा हल्ला

शुल्लक कारणावरुन गुंडांनी दोघांवर जीवघेणा हल्ला केला.  

Updated: Jun 8, 2021, 09:36 AM IST
नागपूर की वासेपूर...शुल्लक कारणावरुन गुंडांचा दोघांवर जीवघेणा हल्ला title=
संग्रहित छाया

नागपूर : शुल्लक कारणावरुन गुंडांनी दोघांवर जीवघेणा हल्ला केला. (Nagpur Attack) गुंडांनी पाठीत आणि पोटात चाकूचे वार करत दोघांना रक्तबंबाळ केले. याच अवस्थेत तरुण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत गुंड सलमान शेखसह त्याच्या साथिदारांना अटक केली आहे. 

नागपुरातील गुंड किती निर्ढावलेत याचा प्रत्यय नागपूरकरांना पुन्हा आला आहे. नागपुरच्या कपिलनगरमध्ये गुंडांनी दोन तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात विनय राबा आणि कुणाल जयस्वाल गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर त्यांच्या पोटात आणि पाठीत चाकू खुपसलेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत ते दोघे पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यावेळचा व्हिडिओ व्हायरल  झाला. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या सलमान शेख आणि त्याच्या साथिदारांना पोलिसांनी अटक केली. रागाने का, पहातो असे म्हणत या तरुणांवर सलमान शेखने हा हल्ला केला.