धक्कादायक, यांनी रेमडेसिविरचे इंजेक्शन्स घरीच बनवले..इंजेक्शनमध्ये भरलं असं औषध

 देशात रेमडेसिविर इंजेक्शनला (Remdesivir Injection) प्रचंड मागणी आहे. परंतु या इंजेक्शनचा काळाबाजार थांबतच नाही आहे.

Updated: Apr 18, 2021, 06:36 PM IST
धक्कादायक, यांनी रेमडेसिविरचे इंजेक्शन्स घरीच बनवले..इंजेक्शनमध्ये भरलं असं औषध title=

बारामती : देशात रेमडेसिविर इंजेक्शनला (Remdesivir Injection) प्रचंड मागणी आहे. परंतु या इंजेक्शनचा काळाबाजार थांबतच नाही आहे. काही लोकं आपल्या फायद्यासाठी नकली इंजेक्शन विकून रुग्णांच्या जिवाशी खेळत आहेत. महाराष्ट्राच्या बारामतीमधून अशीच एक बातमी समोर आली आहे. यामध्ये रेमडेसिविर नकली इंजेक्शनच्या गुन्ह्या खाली 4 लोकांना (Four Arrested  For Selling Fake Injection) अटक केले आहे.

यांच्याकडून 3 नकली इंजेक्शन देखील जप्त (Seized Three Injection) करण्यात आले आहेत. पुणे ग्रामीणमधील डेप्यूटी एसपी नारायण शिरगांवकर यांनी या घटनेचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, चार आरोपींकडून त्यांनी 3 रेमेडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, इंजेक्शनवर रिमडेसिविरचे लेबल लावले गेले होते, परंतु त्यात पेरासिटामॅालचे लिक्विड भरले गेले होते.

देशाच्या बहुतेक भागांमध्ये सध्या रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता आहे. मेडिकल स्टॉर्समध्येही हे इंजेक्शन उपलब्ध नाही आहे. याच गोष्टींचा फायदा असे भामटे घेतात आणि नकली इंजेक्शन विकून पैसे कमवतात.\

महाराष्ट्रात देखील इंजेक्शनची मागणी

झारखंड, उत्तराखंड, दिल्ली आणि यूपीच्या सोबतच महाराष्ट्रातही इंजेक्शनची खूपच कमतरता आहे. लोकं हे इंजेक्शन घेण्यासाठी मेडिकल बाहेर लांबच लांब रांगा लावून उभे आहेत. यूपीच्या प्रयागराजमध्ये 2 हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी आहे. परंतु सध्या 100 इंजेक्शन त्यांना पुरवण्यात आले आहेत. यामुळे रुग्णांना त्याच्या गरजेनुसार इंजेक्शन मिऴत नाहीत.

डॉक्टरच्या चिठ्ठी विना रेमडेसिविर नाही

डॉक्टरच्या चिठ्ठी विना मेडिकल स्टोर्स रेमडेसिविर इंजेक्शन देत नाहीत. तर डॉक्टरांच्या म्हण्यानुसार त्यांना बाहेरुन इंजेक्शन देण्यासाठी सरकारकडून परवानगी नाही. तसेच हॅस्पिटलमध्ये देखील इंजेक्शनचा तुटवडा आहे. तर मेडिकल स्टोअर्स वाले सांगतात की, विना चिठ्ठी जर त्यांनी इंजेक्शन विकले तर, ते ब्लॉकमधून विकल्याचा आरोप त्यांच्यावर लागतो. प्रशासनाने त्यांना सक्त ताकिद दिली आहे की, हॉस्पिटलच्या चिठ्ठीवर आणि पेशन्टचे डिटेल तपासल्यावर त्यांना रेमडेसिविरच्या इंजेक्शन दिले जावे.