त्रिपुरा घटना : अमरावतीत भाजप बंदला हिंसक वळण, आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

 Tripura violence : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  

Updated: Nov 13, 2021, 11:01 AM IST
त्रिपुरा घटना : अमरावतीत भाजप बंदला हिंसक वळण, आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड title=

अमरावती : Tripura violence : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भाजप बंदच्या (BJP Protests) पार्श्वभूमीवर अमरावती शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण लागले आहे. ( Violent bandh in Amravati, shops vandalized by protesters) आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. राजकमल चौकात आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून जमावाला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Maharashtra: Protests against Tripura violence, Violent bandh in Amravati, shops vandalized by protesters)

त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर तणाव निर्माण झाला असून यावेळी तोडफोड आणि दगडफेकीचा प्रकार घडला. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात जमाव जमाल्याने पोलिसांना पाचारण कऱण्यात आली आहे. दरम्यान, तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला आहे. अमरावतीच्या जनतेने अशा राजकारणाला बळी पडू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता राखावी, असे आवाहन अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

अमरावतीच्या राजकमल चौकात भाजपसह अनेक संघटनांचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोठा जमाव जमा झाला आहे. राजकमल चौकात कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी सुरु केली आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अमरावाती भाजपच्या बंदला सुरुवात झाली असून बंदसाठी SRPF च्या दोन तुकड्या तर 400 पोलीस तैनात करण्यात आले आहे. काल भाजपने  बंदची हाक दिली होती. साडेनऊ वाजता शहरातील राजकमल चौकात भाजपचे कार्यकर्ते जमल्यानंतर मोठा जमाव झाला.

नागपूरचे DIG संदीप पाटील स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे अमरावती शहराची पोलिसांची कमान नागपूरचे DIG संदीप पाटील यांच्या हाती आहे. दरम्यान, तोडफोड प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशने मध्ये सात जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.  अनोळखी व्यक्ती विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजवरून पोलीस करणार तपास करणार आहेत.

त्रिपुरातील घटनांच्या निषेधासाठी शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चादरम्यान चित्रा चौक ते मालवीय चौकादरम्यान काही दुकानांवर दगडफेक करून वाहनांची नासधूस करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दगडफेकीत तीन जण जखमी झाले.