राज्यात ५१८२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी नाही 

Updated: Dec 3, 2020, 08:12 PM IST
राज्यात ५१८२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले

मुंबई : आज राज्यात ५१८२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५८% एवढा आहे.  तसेच आज ८०६६ नवे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७०३२७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७०% एवढा झाला आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११०५९३०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८३७३५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५४८१३७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ५९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ओरडते. मुंबईत १४०७६ रुग्ण ऍक्टिव आहेत तर ठाणे १५१४० कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव आहेत. पुण्यात ऍक्टिव कोरोनाबाधितांचा आकडा हा १९८४१ इतका आहे. 

 देशात आणि संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या coronavirus कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावानं मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातही चिंचा वाढवली आहे. दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडले आणि काही अंशी झालेल्या बेजबाबदार वर्तनामुळं पुन्हा एकदा काहीसा नियंत्रणात येणारा कोरोना फोफावला.