Maharashtra SSC 10th Results 2024 : 2023- 2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या शालान्त परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra SSC 10th Results) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी राज्यातील हा निकाल जाहीर केला.
शिक्षण मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला. यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेमध्ये दमदार कामगिरी करत कोकणातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली. कोकण विभागाच्या यंदाच्या निकालाची आकडेवारी आहे 99.01 टक्के. शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार या वर्षीसुद्धा निकालावर मुलींचच वर्चस्व पाहायला मिळालं.
राज्यातील निकालाची विभागनिहाय आकडेवारी
विभाग |
निकालाची टक्केवारी
|
पुणे | 96.44 टक्के |
नागपुर | 94.73 टक्के |
छत्रपती संभाजीनगर | 95.19 टक्के |
मुंबई | 95.83 टक्के |
कोल्हापूर | 97.45 टक्के |
अमरावती | 95.58 टक्के |
नाशिक | 95.28 टक्के |
लातूर | 95.27 टक्के |
कोकण | 99.01 टक्के |
मुलींचा आणि मुलांचा निकाल/ टक्केवारी
उत्तीर्ण मुली | 97.21 टक्के |
उत्तीर्ण मुलं | 94.56 टक्के |
विभाग | विद्यार्थ्यांची संख्या |
पुणे | 10 |
नागपुर | 1 |
छत्रपती संभाजीनगर | 32 |
मुंबई | 8 |
कोल्हापूर | 7 |
लातूर | 123 |
कोकण | 3 |
यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळानं एटीकेटीची तरतूद केली आहे. ज्यामुळं अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं एक वर्ष व्यर्थ जाणार नाहीय. दहावीच्या एखाद्या विद्यार्थ्याला एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होता आलं नाही तरीही ते विद्यार्थी इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
यंदाच्या वर्षी जून महिन्यात त्या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश घेता येणार आहे. पण, अकरावीचा अंतिम निकाल लागण्याआधी विद्यार्थ्यानं दहावीच्या अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण होणं अपेक्षित असेल. शालेय शिक्षण मंडळाच्या या सुविधेमुळं यंदा 26 हजार विद्यार्थ्यांना एटीकेटीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती जारी करण्यात आली.