close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

धक्कादायक! नवविवाहितेला मामीने विकलं, पण मामाने वाचवलं

नाशिकमधला धक्कादायक प्रकार

Updated: Jun 24, 2019, 08:53 PM IST
धक्कादायक! नवविवाहितेला मामीने विकलं, पण मामाने वाचवलं

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहेरी आलेल्या नवविवाहितेची तिच्याच मामीने दीड लाखात विक्री केली आहे. पण वेळीच पोलिसांची चक्रं फिरली आणि या भामटीचा पर्दाफाश झाला. 

सख्ख्या मामीनं आपल्या भाचीला विकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एक लग्न झाल्यावरही दुसरं लग्न लावलं गेलं. नाशिकमध्ये सध्या याच घटनेची जोरदार चर्चा आहे. भाचीला फसवणारी परवीन उर्फ राणी शेख असं या महिलेचं नाव आहे. नाशिकच्या वडाला गावात राहणार्‍या नवविवाहितेला अजमेरला दर्शनासाठी जाण्याचा बहाणा करत ती मध्य प्रदेशात घेऊन गेली. मध्य प्रदेशात पीडितेवर अत्याचार करण्यात आले. तिनं कसाबसा मामाला फोन केला. यानंतर मामानं अखेर या तरुणीला वाचवलं. 

नाशिक पोलिसांनी परवीन उर्फ राणी शेखसह तिघांना मध्य प्रदेशात जाऊन अटक केली. गरीब कुटुंबांना मोठ्या रकमेचं आमिष दाखवून मुलींची विक्री करणारं रॅकेट नाशिकमध्ये सक्रिय असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या आधी याच परिसरातल्या दोन ते तीन मुलींची विक्री झाली आहे. यामागे हीच मामी आहे की आणखी कुणी, याचा तपास पोलीस करत आहेत.