नवऱ्याला संपवले, कर्जतच्या जंगलात पुरले, मग पोलिसांत तक्रार द्यायला गेली अन् अडकली

Wife Killed Husband In Neral: प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Updated: Jul 24, 2023, 01:47 PM IST
नवऱ्याला संपवले, कर्जतच्या जंगलात पुरले, मग पोलिसांत तक्रार द्यायला गेली अन् अडकली  title=
Man shot by wifes boyfriend buried in karjat forest in raigad news

Love Affair News In Marathi: प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काटा काढल्याची घटना घडली आहे. इतकंच नव्हेतर पत्नीने पोलिसांची दिशाभूल करुन प्रकरणाचा वेगळे वळण लावण्याचा प्रयत्नही आरोपी महिलेने केला होता. मात्र, पोलिसांनी तिचा हा प्रयत्न हाणून पाडत प्रियकरासोबत अटक केली आहे. (Wife Killed Husband In Neral)

नेरळमधील कर्जत तालुक्यातील देवपाडा येथे ही घटना घडली आहे. सचिन मुरबे असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सचिन हा रिक्षा चालक होता. त्याचे काही वर्षांपूर्वी अरुणासोबत लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या काहीच वर्षात त्यांच्यात खटके उडू लागले. त्यातच पत्नी अरुणा हिचे ऋषिकेत तुपेसोबत सूत जुळले. मात्र दोघांच्या संबंधात पती अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याची हत्या करण्याचा कट रटला. ऋषिकेष तुपे त्याचा शिकारीसाठी घेऊन गेला आणि तिथेच त्याची हत्या केली. 

अरुणाने 15 जुलै रोजी पती सचिन मुरबे बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. त्यावेळी तिच्यासोबत प्रियकर ऋषिकेश तुपेदेखील सोबत होता. पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करुन तपास सुरु केला. मात्र पोलिसांना दोघांच्या बोलण्यावर संशय आला. त्यामुळं पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली. त्याचवेळी गुप्त माहितीदारांकडून ऋषिकेश सचिनला शिकारीसाठी जंगलात घएऊन गेला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारावर पोलिसांनी ऋषिकेशला पोलिस ठाण्यात बोलवून घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याचे आणि अरुणाचे विवाहबाह्य संबंध असल्याचे उघड झाले. त्यांच्यात सचिन अडथळ ठरत असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. 

ऋषीकेशने 15 जुलै रोजी रात्री साडेनउच्या सुमारास देवपाडा गावाच्या हद्दीतील आरीच्या जंगलभागात सचिनला घेऊन गेला. शिकारीला जाण्याचा बहाणा करत तो सोबत घेऊन गेला होता.  सचिनची हत्या करण्याचा कट करुनच त्याने त्याला सोबत घेतले होते. त्यानंत जंगलात आत गेल्यानंतर शिकारीसाठी घेतलेल्या ठासणीच्या बंदुकीने सचिनच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याचा मृतदेह जंगलातच पुरला. 

ऋषिकेशने पोलिसांना जबाब दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी कर्जतच्या दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत जंगलात जाऊन पुरलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाला बाहेर काढले. सचिनचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळं मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपी ऋषिकेश आणि अरुणा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.