तुमच्या संभाषणाच्या क्लीप व्हायरल करु; महाजनांवर का चिडले जरांगे-पाटील?

मनोज जरांगेंनी आता मंत्री गिरीश महाजनांना इशारा दिलाय. यामुळे  मंत्री छगन भुजबळ विरुद्ध जरांगे-पाटील असा सामना सुरु असतानाच नावा वाद निर्माण झाला आहे. 

Updated: Dec 4, 2023, 11:40 PM IST
तुमच्या संभाषणाच्या क्लीप व्हायरल करु; महाजनांवर का चिडले जरांगे-पाटील? title=

Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस बाकी आहे, त्यात जरांगे-पाटील मंत्री गिरीश महाजनांवर चांगलेच संतापलेत. गिरीश महाजनांनी चुकीची वक्तव्य करु नयेत, नाहीतर त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असा थेट इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे. 

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत असं विधान मंत्री गिरीश महाजनांनी केलं होतं, त्यामुळे जरांगेंचा तिळपापड झालाय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत असं विधान मंत्री गिरीश महाजनांनी केलं होतं, त्यामुळे जरांगेंचा तिळपापड झालाय.

आधीच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ विरुद्ध जरांगे-पाटील असा सामना सुरु आहे. त्यात गिरीश महाजनांच्या रुपानं दुसरा मंत्री सरकारच्या निशाण्यावर आलाय.

जरांगे विरुद्ध भुजबळ वाद

मलकापूरमधल्या सभेत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या भाषणात भुजबळांचा उल्लेख 'येडपट येवल्याचं' असा केला. ओबीसी नेत्याचं ऐकू नका, असं आवाहन त्यांनी केलं. न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल 9 डिसेंबरला येणाराय. 32 लाख पुरावे सापडल्यानं आता मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल, असंही जरांगेंनी ठणकावून सांगितलं.

 मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपला विरोध नाही. मात्र त्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये ही आपली एकट्याचीच मागणी नाही. तर कुणबी समाजासह सर्व नेत्यांची हीच मागणी आहे. त्यामुळे जरांगेंनी आपल्यालाच टार्गेट करू नये असं छगन भुजबळांनी म्हंटलंय. जरांगेंनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत त्यांना लक्ष केलं होतं, त्याला भुजबळांनी उत्तर दिलंय. 

24 डिसेंबरला सरकार अडचणीत आलं तर आम्ही जबाबदार नाही - जरांगे यांचा इशारा 

मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे, फडणवीस, अजित पवारांनी  लक्ष घालावं. अन्यथा 24 डिसेंबरला सरकार अडचणीत आलं तर आम्ही जबाबदार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. त्याचबरोबर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये 17 डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला बैठकीसाठी हजर राहण्याचं आवाहन केलंय. जळगाव दौ-यावर असताना जरांगे बोलत होते.