खासदार हीना गावित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला

धुळ्यात खासदार हीना गावित यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय.

Updated: Aug 5, 2018, 04:10 PM IST

धुळे : धुळ्यात खासदार हीना गावित यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हा प्रकार घडलाय.  खासदार हिना गावित नियोजन मंडळाची बैठक संपवून नंदुरबारकडे रवाना होत असातंना मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी हा हल्ला केला.

आरोपींना अटक 

खासदार हिना गावित गाडीत बसलेल्या असातांना गाडीची तोडफोड करण्यात आली. यावेळी हीना गावित यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय.  गेटमधून काही मराठा आंदोलक मध्ये आले आणि त्यांच्या गाडीवर हल्ला केला. हीना गावित यांना सुरक्षितपणे गाडीतून बाहेर काढण्यात आलंय.