फ्रेंडशिप डे २०१८: ठाण्यात भेटवस्तू खरेदीकडे तरुणाईची पाठ; खवय्येगिरीला प्राधान्य

 गेल्या वर्षीपासून मैत्री दिनाविषयी तरुण वर्गाला वाटणारे अप्रूप कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळेच भेटवस्तूंची मागणीही कमी झाल्याचे जाणवते. 

Updated: Aug 5, 2018, 11:52 AM IST
फ्रेंडशिप डे २०१८: ठाण्यात भेटवस्तू खरेदीकडे तरुणाईची पाठ; खवय्येगिरीला प्राधान्य title=

कपील राऊत, झी मीडिया, ठाणे: ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार तरुणाई आणि बच्चेकंपनीसाठी खास असतो. कारण हा रविवार साजरा होतो तो फ्रेंडशिपडे म्हणून.. फ्रेंडशीपडे निमित्ताने मित्रमंडळींना भेटवस्तू, भेटकार्डे देण्याची फ्रेंडशीप बँड बांधण्याची प्रथाही गेल्या काही वर्षांत रुजली.. मागणीनुसार दुकानंही सजू लागली.. यंदा मात्र हा बाजार थंडावल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीपासून मैत्री दिनाविषयी तरुण वर्गाला वाटणारे अप्रूप कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळेच भेटवस्तूंची मागणीही कमी झालीये.. 

बाजारात शुकशुकाट

खरंतर फ्रेंडशीपडे म्हटलं की भेटवस्तू, भेटकार्डाची देवाणघेवाण हे आलंच. त्यासाठी बाजारपेठा सजून जातात. यंदा मात्र भेटवस्तूंचा बाजार काहीसा मंदावलेला दिसतोय.. त्यामुळे बाजारात शुकशुकाट आहे. भेटवस्तूंची दुकानं रिकामी झाली असली तरी, रेस्टॉरंटमध्ये मात्र गर्दी वाढू लागल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर खास सवलती जाहीर करुन रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थाची दुकानं तरुणाईला आकर्शित करु पहाताहेत.

रेस्टॉरंटमध्ये गर्दी

भेटवस्तूंची दुकानं रिकामी झाली असली तरी रेस्टॉरंटमध्ये मात्र गर्दी वाढू लागल्याचं चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे खास सवलती जाहीर करुन रेस्टॉरंट, रेस्टो-बार आणि खाद्यपदार्थाची दुकानं तरुणाईला आकर्शीत करु पहाताहेत आणि तरुणाई देखील याकडे आकर्षीत होतीये. दिवस कोणताही असो.. तो साजरा करणं महत्त्वाचं... मग त्याची पद्धत बदलली तरी काय फरक पडतो? असं तर या तरूणाईला वाटत नसेल ना?