Marathi Sahitya | ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिक येथे सुरूवात

94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशकात आज ग्रंथ दिंडीने सुरूवात झाली. 

Updated: Dec 3, 2021, 10:30 AM IST
Marathi Sahitya | ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिक येथे सुरूवात title=

नाशिक : 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशकात आज ग्रंथ दिंडीने सुरूवात झाली. सलग तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर असून प्रकृती अस्वास्थामुळे अनुपस्थित आहेत.

लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी (आडगाव) येथे सुरू झाले. 

अवकाळी पावसाचे सावट साहित्य संमेलनावर होते. परंतु नाशिकात आज वातावरण चांगले असल्याने साहित्य प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. 

Marathi Sahitya sammelan in nashik, 94th All India Marathi Sahitya Sammelan, begins, Nashik,

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x