अलिशान लग्नांच्या अवास्तव खर्चाला फाटा; पारंपारिक लग्नांचा वाढला ट्रेंड

कोरोनानं खूप काही शिकवलं आणि लग्नांचा ट्रेंडच बदलून टाकला. 

Updated: Mar 15, 2021, 08:45 PM IST
अलिशान लग्नांच्या अवास्तव खर्चाला फाटा; पारंपारिक लग्नांचा वाढला ट्रेंड title=

 पुणे : लग्न म्हटलं की अलिशान गाड्या, अवाजवी खर्च हे सारं काही येतं. पण कोरोनानं खूप काही शिकवलं आणि लग्नांचा ट्रेंडच बदलून टाकला. कोरोनामुळे लोक पुन्हा एकदा पारंपरिक लग्नपद्धतींकडे वळू लागल्याचे दिसून येत आहे.

हेलिकॉप्टरमधून आलेली नवरा-नवरी किंवा बुलेटवरून नववधुनं लग्नमंडपात घेतलेली एन्ट्री आपण अनेकदा पाहिली आहे. पण कोरोना आला आणि लग्नसोहळ्यांचा नूरच पालटला. कधी काळी लग्न सोहळ्यात दिसणारी सर्जा राजाची जोडी पुन्हा दिसू लागली आहे. खर्चाला फाटा देत अनेकजण पारंपरिक पद्धतीनं बैलगाडी रथाचा वापर करू लागले आहे.

खेड तालुक्यातील जैदवाडी येथील सुभाष जैद या शेतकऱ्यानं नव दाम्पत्याच्या मिरवणुकीसाठी चक्क बैलगाडी रथाचा व्यवसाय सुरू केलाय. विशेष म्हणजे त्यांच्या बैलगाडी रथाला मागणीही वाढू लागलीय. 
 
 कोरोनानं सारं जग बदलून टाकलंय. लग्नसोहळेही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. ग्रामीण भागातील तरुणाई स्वतःच्या लग्नात बैलगाडी रथाचा उपयोग करून अगदी मोजक्या खर्चात आणि चांगल्या पद्धतीनं विवाहबद्ध होतीय. आता असेच बैलगाडीचे रथ तुम्हाला शहरातल्या लाऊंजमध्ये दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका