राज्यात पोलिसांची मेगा भरती; 12 हजार 538 जागा भरणार

यासाठी पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.   

Updated: Jan 11, 2021, 07:14 PM IST
राज्यात पोलिसांची मेगा भरती; 12 हजार 538 जागा भरणार

नागपूर : राज्यात पोलीस विभागात मेगा भरती निघाली आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात  दिली. राज्य सरकार पोलीस विभागातील 12 हजार 538 जागा भरणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 5 हजार 297 जागा भरणार असून पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ दुसऱ्या टप्प्यासाठी भरती सुरू करणार असल्याची माहिती खुद्द अनिल देशमुख यांनी दिली. 

पोलीस भरतीविषयी सोमवारी ओबीसी शिष्टमंडळ देखील भेटलं असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले, 'राज्य सरकारने पोलीस विभागात 12 हजार 538 जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीच्या पहिल्या टप्प्यात 5 हजार 297 जागा भरणार आहोत. ' 

यासंबंधी शासनाचा आदेश देखील निघाला असल्याचं त्यांनी सांगितलं. मधल्याकाळात आम्ही एक पत्रक देखील काढलं आहे. पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ दुसऱ्या टप्प्यासाठी भरती सुरू करणार आहोत. 

शिवाय गरज भासल्यास पोलीस दलात आणखी जागा भरण्यास सरकार मान्यता देणार असल्याचं देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तुम्ही पोलीस दलात भरती होण्यासाठी इच्छूक असाल तर राज्य सरकारच्या संधीचा फायदा घ्या.