म्हाडाचे घर घेणे आता बजेटमध्ये, कोकण मंडळाच्या घरासांठी 'इतकी' असेल किंमत

MHADA Konkan Lottery 2023: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीनंतर कोकण मंडळाची लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी घरांच्या किंमतीदेखील समोर आल्या आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 18, 2023, 10:09 AM IST
म्हाडाचे घर घेणे आता बजेटमध्ये, कोकण मंडळाच्या घरासांठी 'इतकी' असेल किंमत title=
MHADA Konkan Lottery 2023 Online Registration and check price

Mhada Konkan Board Lottery: म्हाडाच्या मुंबई मंडळानंतर आता कोकण मंडळाने ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथे 5 हजार 311 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाच्या तुलनेत कोकण मंडळाची घरे स्वस्त आहेत. त्यामुळं घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आजा बजेटमध्ये घरे मिळणार आहेत. या घरांसाठी 7 नोव्हेंबरला म्हाडाच्या वांद्रे पूर्वेतील मुख्यालयात संगणकीय सोडत काढली जाणार आहे. 

कोकण मंडळाच्या घराची कमीत कमी 9 लाख 89 हजार 300 रुपये असून ही घरे अत्यल्प गटातील आहेत. पालघरमधील गोखिवरे येथे ही घरे आहेत. तर, सर्वाधिक घरांची किंमत 41 लाख 81 हजार 834 रुपये असून मध्यम गटातील ही घरे विरार-बोळींज परिसरात आहेत. या व्यतिरिक्त मध्यम गटासाठीची घरे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात असून या घरांच्या किंमती 33 लाखांवर आहेत. विरार, बोळींज परिसरातील घरे अल्प आणि मध्यम गटासाठी असून या घराची किंमती 23 लाखांपासून 41 लाखांपर्यंत आहेत. 

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी व अर्जभरणा प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.  https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जनोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे. १८ ऑक्टोबरला आज रात्री ११.५९पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 3 नोव्हेंबरला 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, ७ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत जाहीर केली जाईल. त्यातून अर्जदारांना सोडतीचा निकाल तत्काळ मोबाइलवर एसएमएसवर येणार आहे. 

अत्यल्प गटाची घरे?

शिरढोण, खोणी, गोठेघर, बोळींज येथे अत्यल्प गटासाठी घरे असून या घरांच्या किंमती 14 लाखांपासून 21 लाखांवर आहेत. रायगडमधील खानावळे, तळेगाव आणि कल्याणमधील घरीवली येथे अत्यल्प गटासाठी 12 ते 13 लाखापर्यंत घरांच्या किंमती आहेत. ठाणे, कल्याण, पालघर जिल्ह्यात अल्प गटासाठी घरे असून त्यांची किंमत 12 ते 32 लाखांपर्यंत आहेत.