Mhada Housing scheme mhada lottery 2024 : मुंबईमध्ये घरांच्या किमी गगनाला भिडलेत.. बिल्डकडून घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झालंय.. त्यामुळे म्हाडा सारख्या प्राधिकरणांवर सर्वसामान्य मुंबईकरांची भिस्त असते.. मात्र म्हाडाने 2024 च्या काढलेल्या जाहिरातीमध्ये घरांच्या किमती पाहून अर्जदार अक्षरक्षा चक्रावलेत.. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमती तर कोटींच्या पुढे आहेत... अल्प उत्पन्न गटासाठी वरळीच्या सस्मिरातील 550 चौरस फुटांच्या फ्लॅटची किंमत तब्बल 2 कोटी 62 लाख रुपये एवढी आहे.. या व्यतिरिक्त विजेत्यांना सेवाशुल्क आणि मालमत्ता करही भरावा लागणाराय. त्यामुळे नऊ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना हा प्लॅट कसा परवडणार... बँका त्यांना एवढे कर्ज देतील का? असा सवाल उपस्थित झालाय.. तर ताडदेवमधील उच्च उत्पन्न गटातील घराची किंमत तब्बल साडे सात कोटींच्या घरात आहे.
स्थळ उत्पन्न गट किंमत
अँटॉप हिल अत्यल्प 41 लाख 51 हजार
वरळी अल्प 2 कोटी 62 लाख
विक्रोळी अल्प 67 लाख 13 हजार
मालाड अल्प 70 लाख 87 हजार
गोरेगाव मध्यम 1 कोटी 11 लाख 94 हजार
पवई मध्यम गट 1 कोटी 20 लाख 13 हजार
पवई उच्च 1 कोटी 78 लाख 71 हजार
अंधेरी उच्च 4 कोटी 87 लाख
ताडदेव उच्च 7 कोटी 52 लाख 61 हजार
तर ही सर्वसामान्यांची फसवणूक असून, सरकार याबाबत उदासीन असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केला. मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येक मुंबईकराचं स्वप्न असतं. खासगी घरं परवडत नाहीत त्यामुळे मुंबईकर म्हाडा सारख्या सरकारी संस्थांच्या आशावर असतात.. मात्र म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किमतीपाहून मुंबईकरांचं घराचं हे स्वप्न दिवास्वप्नच ठरताना दिसतंय..
मराठी नाटक आणि टीव्ही मालिकांमध्ये लेखक हे महत्त्वाची भूमिका बजावतात. लिहिण्याची एक कला असते म्हणून त्यांनाही कलाकार म्हणतात.. मात्र हे लेखक आता कलाकार आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचे कारण आहे म्हाडाच घर. टीव्ही मालिका लिहिणाऱ्या एका लेखकाने म्हाडा सोडतीत कलाकार या कोट्यातून अर्ज भरला होता. त्याला घर देखील लागले.
म्हाडाचे घर मिळाल्यानंतर त्याने कलाकार असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सांस्कृतिक संचालनालयाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांना जे उत्तर मिळाले ते एकूण त्यांच्यासह अनेक लेखकांना धक्का लागला आहे. लेखक हे कलाकार नाहीत असे त्यांना सांगण्यात आले... त्यामुळे आता ज्या लेखकांना घरे मिळाली आहेत आणि ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. याप्रकरणी मानाचि संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे..