उत्तर भारतातून रोज एवढे मजूर राज्यात परतायला सुरुवात

पुन:श्च हरी ओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातला लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला.

Updated: Jun 18, 2020, 08:16 PM IST
उत्तर भारतातून रोज एवढे मजूर राज्यात परतायला सुरुवात title=
प्रातिनिधीक फोटो

मुंबई : पुन:श्च हरी ओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातला लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बंद झालेले व्यवसाय आणि उद्योग पुन्हा सुरू झाले. उद्योग सुरू झाल्यामुळे आता परराज्यातले मजूरही पुन्हा महाराष्ट्रात परतायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात परतणाऱ्या या मजुरांबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे. 

'महाराष्ट्रामध्ये अनलॉकनंतर हळूहळू उद्योग सुरू होत आहेत, त्यामुळे परप्रांतातून मजूर महाराष्ट्रात परतू लागले आहेत. हे मजूर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील आहेत. दररोज १६ ते १७ हजार परप्रांतीय श्रमिक राज्यात परत येत आहेत. मजुरांची ही संख्या अजूनन वाढेल', असं अनिल देशमुख म्हणाले. 

उद्योग सुरू झाल्यामुळे हाताला काही काम मिळेल या आशेने हे मजूर महाराष्ट्रात परत येत आहेत. या मजुरांची योग्य नोंद आणि थर्मल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असंही गृहमंत्र्यांनी सांगितलं.

राज्यातले उद्योगधंदे पुन्हा सुरू होतील, तेव्हा परराज्यातून येणाऱ्या मजुरांची नोंद करा, तसंच उद्योग पुन्हा सुरू झाल्यानंतर भूमीपूत्रांना या रोजगारांमध्ये प्राधान्य द्या, अशी मागणी मनसेने याआधी केली होती.

भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी मनसे आग्रही; केल्या 'या' मागण्या