मुंबई : आम्ही १५ कोटी १०० कोटींवर भारी पडू असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमच्या वारिस पठाण यांनी केले. यानंतर त्यांच्यावर चहोबाजुनी टीकेची झोड उठली. माझे वक्तव्य कोणत्या धर्माविरोधी नव्हते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी माझे शब्द मागे घेतो असे म्हणत त्यांनी आपला माफीनामा जाहीर केला. त्यामुळे वादग्रस्त विधानावर वारिस पठाणांची सारवासारव पाहायला मिळाली.
कोणत्या धर्माचा अपमान केला नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे वारिस पठाण म्हणाले.
वारिस पठाण यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अटकेची मागणी केलीये. तर वारीस पठाणांवर कारवाई होणार आहे. संबंधितांना याबाबत सूचना देण्यात आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय. पठाण यांच वक्तव्य चुकीचंच असल्याचं मत देशमुख यांनी व्यक्त केलंय.
आम्ही १५ कोटी असलो, १०० कोटींना आम्ही भारी पडू असं वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी केलं आहे. आम्ही एकत्र आलो तर तुमचं काय होईल, असं वक्तव्य केलं आहे. वारीस पठाण यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं, त्यावेळी एमआयएमचे असदुद्दीन ओवीसी देखील उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे.
वीटेचं उत्तर दगडाने उत्तर देऊ, आता तर वाघीणी बाहेर आल्या आहेत, आम्ही सर्व एकत्र आलो तर काय होईल, आम्ही १५ कोटी असलो, १०० कोटींना आम्ही भारी पडू असं वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी केलं आहे. कर्नाटकातील गुलबर्गामध्ये माजी आमदार वारीस पठाण यांनी हे वक्तव्य केलं आहे.