मंत्री दिवाकर रावतेंनी भाजपला काढला जोरदार चिमटा

गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देऊन वाल्याचा वाल्मिकी करता म्हणजे तुमचा पक्ष सुधारगृह आहे का ? असा सवाल करत शिवसेना नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपाला अप्रत्यक्ष टोला हाणला. 

Updated: Sep 9, 2017, 11:22 AM IST
मंत्री दिवाकर रावतेंनी भाजपला काढला जोरदार चिमटा title=

यवतमाळ : गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देऊन वाल्याचा वाल्मिकी करता म्हणजे तुमचा पक्ष सुधारगृह आहे का ? असा सवाल करत शिवसेना नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपाला अप्रत्यक्ष टोला हाणला. 

यवतमाळमध्ये शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते. राम मंदिर निर्माण करण्याचे वचन देऊन सत्तेत आलेल्या भाजपाच्या राज्यात रामाचा वनवास संपलेला नाही, असे ते म्हणालेत.

राम मंदिरासाठी यात्रा काढणाऱ्या अडवाणींना ज्याने बिहारमध्ये अटक केली. त्याला केंद्रात मंत्रिपद मिळाले म्हणजेच रामा करीता जो भांडला त्याचा अडवाणी होतो, अशीही टीका त्यांनी केली. सत्ता शिवसेनेचं ध्येय नाही, सत्ता राबवून घेणं हा निर्धार आहे. शिवसेना युतीमध्ये आहे पण युती करून सत्तेत आलो नाही, असेही दिवाकर रावते म्हणाले.