मुंबई : मुंबईतल्या मालाड येथे फेरीवाल्यांनी मनसे कार्यकरत्यांना केलेल्या मारहाण प्रकरणाचे पडसाद नवी मुंबईतही उमटले.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईतल्या वाशी रेल्वे स्थानकाबाहेरच्या अनधिकृत फेरीवाल्यांना पळवून लावलं. तसंच त्यांच्या सामानाची तोडफोडही केली.
यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थाळी दाखल झाले. या घटनेनंतर फेरीवाल्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर बेकायदेशीर फेरीवाल्यांना विरोध सुरुच ठेवणार असल्याचा इशारा मनसेनं दिलाय.
या प्रकरणी रविवारी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मनसेवर हल्ला चढवला.