'आई-बाबा मला माफ करा...', कोकणकड्यावरून उडी मारून तरुणीची मृत्यूला कवटाळणी; हरिश्चंद्र गडावर नेमकं काय घडलं?

Girl threw herself from kokankada : हरिश्चंद्रगडवरील 1400 फुट खोल कोकणकड्यावरून एका तरुणीने उडी मारत स्वत:चं आयुष्य संपावलं. नेमकं काय काय झालं? पाहा

सौरभ तळेकर | Updated: Apr 9, 2024, 06:13 PM IST
'आई-बाबा मला माफ करा...', कोकणकड्यावरून उडी मारून तरुणीची मृत्यूला कवटाळणी; हरिश्चंद्र गडावर नेमकं काय घडलं? title=
Nashik Crime News kokankada

Nashik Crime News : हरिश्चंद्रगडवरील कोकणकड्यावरून मुंबईतील एका तरुणीने उडी मारून आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. 22 वर्षांची ही तरुणी मुंबईतील घाटकोपर येथील राहणारी आहे. मृत तरुणीचं नाव आवनी मावजी भानुशाली असल्याचं तपासात समोर आलंय. दोन दिवसांपूर्वी दुपारी 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास येऊन कोकणकडावर ही घटना घडली. मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांना खबर देण्यात आली. आज या मुलीचा मृतदेह रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बाहेर काढण्यात आला आहे. तरुणीने आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट देखील लिहिल्याची माहिती समोर आली आहे. आई-बाबा मला माफ करा, अशा आशयाची नोट तरुणीने लिहिली आहे. 

हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून सुमारे 1400 फूट खाली असलेल्या कोकणकड्यावर उभं राहिलं तरी अंगावर काटा येतो. मात्र, तरुणीने याच कोकणकड्यावरून स्वत:ला मृत्यूच्या दारी झोकून दिलं. आई बाबा मला माफ करा, मला कोणीही मदत करू शकलं नाही. मला शब्दात सांगणं अवघड झालाय. मला तुम्हाला खुप काही सांगायचंय पण मी ते सांगू शकत नाही. मी प्रार्थना करते की, कोणावरही अशी वेळ येऊ नये आणि कोणीही असं पाऊल उचलू नये, अशा शब्दात तरुणीने अखेरच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

झालं असं की, एक आवनी ही तरुणी पाचनई गावातून हरिश्चंद्र गडावर निघाली. दुपारीच्या पहारात तरुणी गडावर पोहोचली. त्यानंतर तिने थेट कोकणकड्याची वाट धरली. अडीचच्या सुमारास तरुणी कोकणकड्यावर पोहोचली. ऊन असल्याने कोकणकड्यावर गर्दी कमी होती. मात्र, काही वाटेकरी कोकणकड्याजवळ उपस्थित होते. त्यांनी तरुणीने जाताना पाहिलं. मात्र, तिने मनात चाललेल्या शंकानिशांकाचा कोणालाही पत्ता लागला नाही. तरुणीने आपली बॅग खाली ठेऊन कोकणकड्याच्या उजव्या बाजूकडे जात खाली उडी मारली अन् आयुष्य संपवलं. 

दरम्यान, अंगावर शहारे येतील असा कोकणकडा गिर्यारोहकांसाठी प्रसिद्ध पाईट आहे. मनाचं समाधान व्हावं, इतकं सुंदर दृष्य या कोकणकड्यावरून पहायला मिळतं. काही महिन्यांपूर्वी हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा दरीत पडून मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वी काही तरुण धुक्यामुळे हरिश्चंद्र गडावर अडकले होते. मात्र, तरुणीच्या केलेल्या आत्महत्येमुळे आता हरिश्चंद्र गडावर शोकाकूळ वातावरण पहायला मिळत आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.