माकडाचं पिल्लू विद्युत खांबावर विजेचा धक्का लागून मृत्युमुखी

चंद्रपूर शहरातल्या रयतवारी कॉलरी परिसरात सकाळी मनाला चटका लावणारी घटना घडली. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 9, 2018, 09:23 AM IST
माकडाचं पिल्लू विद्युत खांबावर विजेचा धक्का लागून मृत्युमुखी  title=

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातल्या रयतवारी कॉलरी परिसरात सकाळी मनाला चटका लावणारी घटना घडली. 

सकाळी एक माकडाचं पिल्लू विद्युत खांबावर खेळत असताना त्याला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर लोकांनी हे पिल्लू खाली काढलं. मात्र या पिल्लाची आई कोणालाच या पिल्लाला हात लावू द्यायला तयार नव्हती. ती या मृत पिल्लाला जवळ घेण्यासाठी धडपड करत होती आणि पिल्लाच्या जवळ येणा-या लोकांच्या अंगावर धावून जात होती. 

जवळपास दीड तास माकडिणीची ही घालमेल सुरु होती. अखेर लोकांनी वनविभागाला या सर्व प्रकाराची माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या वनविभागाने एअरगननं हवेत गोळी झाडून या माकडिणीला दूर पळवलं आणि पिल्लाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर ही माकडीण शांत झाली.