close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

माता- पित्यांनी चिमुरडीला मारून पिशवीत बसमध्ये टाकलं आणि...

या भागात घडली मन हेलावणारी घटना 

Updated: Aug 25, 2019, 01:11 PM IST
माता- पित्यांनी चिमुरडीला मारून पिशवीत बसमध्ये टाकलं आणि...

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : कळमनुरी आगारात थांबलेल्या बसमध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे हे अर्भक एका पिशवीत बांधून ठेऊन दिले होते, ही धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. या मृत अर्भकाची गळा आवळून खून केल्याची माहिती पुढे आली आहे.  

एमएच २० बीएल ०८३८ क्रमांकाची सोलापूर कळमनुरी बस कळमनुरी आगारात पोहोचली होती. बसमधील प्रवाशी उतरल्यानंतर वाहकाला बसमध्ये प्रवाशांच्या सीटच्या पाठीमागील सामान ठेवण्याच्या जाळीला एक पिशवी आढळली. या पिशवीचे तोंड बांधून होते. वाहकाने कुणाची तरी पिशवी विसरून राहिली म्हणून आगारात जमा करण्याच्या उद्देशाने बसच्या बाहेर काढली, पण पिशवी थोडी जड वाटल्याने या पिशवीत वेगळंच काही तरी असल्याचा वाहकाला आणि चालकाला संशय आला, पिशवी सोडून बघितली असता यात स्त्री जातीचे नवजात मृत अर्भक आढळून आले. 

या सर्व प्रकारानंतर आगारात एकच खळबळ माजली, ज्यानंतर आगरातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली. पोलीस बस स्थानकात आल्याने प्रवाश्यांनी एकच गर्दी केली होती, मृत अर्भकास ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठवले असता दोरीने अर्भकाचा गळा आवळून हत्या केल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून  पुढे येत असल्याची माहिती समोर आली आहे. सदर हत्येप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात अज्ञात निर्दयी माता पित्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.