वसईत अमेरिकेहून सरप्राईज देण्यासाठी आलेल्या सुनेची सासूकडून हत्या

वसईमधला धक्कादायक प्रकार

Updated: Dec 16, 2019, 08:55 PM IST
वसईत अमेरिकेहून सरप्राईज देण्यासाठी आलेल्या सुनेची सासूकडून हत्या

प्रथमेश तावडे, झी मीडिया, मुंबई : वसईत सासूनं सूनेची हत्या केल्याप्रकरणी त्या सासूला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी रियाच्या बहिणींनी केली आहे. खरं तर रिया अमेरिकेहून सरप्राईज देण्यासाठी भारतात आली होती. पण तिचाच सासूनं खून केला.

वसईत जे घडलंय ते सुन्न करुन टाकणारं आहे. डोकं चक्रावून टाकणारं आहे. सासूनं सुनेच्या डोक्यात फ्लॉवरपॉट घालून खून केला. रिया मानेला सहा महिन्यांची मुलगी आहे. रियाची क्रूरकर्मा सासू आनंदी मानेने हत्या केली. सूनेनं आपल्या मुलाला आपल्यापासून तोडलं याच्या रागानं आनंदीनं रियाचा खून केला. रोहन आणि रियाचं सहा वर्षांपूर्वी लग्न झालं. तेव्हा रिया नर्स होती. लग्नानंतर आनंदीनं सुनेचं नाव बदलून रिया नाव ठेवायला लावलं. 

रोहन आणि रिया अमेरिकेला राहात होते. सहा महिन्यांपूर्वी रियाला मुलगी झाली. नातेवाईकांना सरप्राईज देण्यासाठी रिया भारतात आली. पण आनंदीच्या मनात सतत रियाबद्दल राग होता. ती झोपेत असताना तिच्या डोक्यात फ्लॉवरपॉटनं वार करुन आनंदीनं सूनेचा खून केला. सुशिक्षित सुसंस्कृत कुटुंबातला हा खून झोप उडवणारा आहे. सहा महिन्यांच्या बाळाच्या आईचा खून करायला एक आईच धजावते, हे फारच सुन्नं करणारं आहे.