close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विखे-थोरात यांचा एकत्रित विमान प्रवास

या एकत्रित विमान प्रवासाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Updated: Jul 15, 2019, 04:04 PM IST
विखे-थोरात यांचा एकत्रित विमान प्रवास

मुंबई : काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात आणि भाजपचे खासदार .डॉ.सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी शिर्डी ते दिल्ली पर्यंतचा प्रवास योगायोगाने एकाच विमानाने केला. त्यांच्या या एकत्रित विमान प्रवासाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सोमवारी सकाळी शिर्डी विमानतळावरून सकाळी साडेदहा वाजताच्या विमानाने ते दिल्लीला रवाना झाले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. केंद्रीय नेत्यांशी त्यांची बैठक आहे. तसेच ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. तर दुसऱ्या ठिकाणी खा. सुजय विखे आपल्या नियोजित कामाने दिल्लीकडे रवाना झाले. सध्या या दोघांचा विमान प्रवासाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सोमवारी सकाळी दोघांनी एकाच विमानातून प्रवास केला. विशेष म्हणजे प्रवास सुरू होण्याआधी दोघे शेजारीशेजारी बसलेले पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या. राजकारणात विखे पाटील आणि थोरात हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका पाहायला मिळाली होती. 

काय म्हणाले थोरात ? 

बाळासाहेब थोरात दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दाखल झाले. सुजय विखे सोबत विमानात असणे हा योगायोग असल्याचं थोरातांनी स्पष्ट केलं तर प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू असल्याचा दावाही केला.