पोलो आणि स्विफ्ट कारची ठोकर, सहा जण ठार तर दोन गंभीर

दुभाजक ओलांडुन पलिकडे जाणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात हा अपघात घडला. 

Updated: May 11, 2019, 08:11 AM IST
पोलो आणि स्विफ्ट कारची ठोकर, सहा जण ठार तर दोन गंभीर  title=

पालघर : मुंबई अहमदाबाद महामार्गावर एक मोठा अपघात घडून यात सहा जण दगावल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. दुभाजक ओलांडुन पलिकडे जाणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात हा अपघात घडला. गुजरात वाहीनीवर भरधाव पोलो कार दुभाजकावर आदळुन दुभाजकावरुन पलिकडच्या मुंबई वाहीनीवरील स्विफ्ट कारला ठोकर दिल्याचा विचित्र प्रकार या ठिकाणी घडला. या विचित्र अपघातात ६ ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना आंबोली येथे घडली. मृतामध्ये सहा जणांमध्ये ५ पुरुष तर १ महीलेचा समावेश आहे. 

मृतांमध्येप्रतिभा परिमल शहा (70 ),राकेश परिमल शहा (50) ,नावनाथ रमाकांत नवले (25 )मोखाडा,आकाश चव्हाण (42) कांदिवली ,बी डी जाधव,(57)पनवेल,  दिलीप चंदने अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये जखमी जिनल शहा (२४ ) कांदिवली,नरेश नारायण सुपे  (४५)जव्हार  यांचा समावेश आहे .त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन मुंबई येथे हलवण्यात आहे आहे.  मृतांमध्ये पाटबंधारे खात्याचे कनिष्ठ अभियंता बी.डी.जाधव यांचा समावेश आहे.