प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती EDकडून रद्द

Praful Patel ED : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा, PMLA कायद्यांतर्गत त्यांच्या वरळी येथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 7, 2024, 04:16 PM IST
प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती EDकडून रद्द title=
Mumbai court quashes attachment of NCP leader Praful Patels properties in money laundering case

Praful Patel ED: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. PMLA कायद्यांतर्गत वरळीयेथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली आहे. जप्त करण्यात आलेल्या सीजे हाऊस फ्लॅटची किंमत जवळपास १८० कोटीच्या घरात असल्याची माहिती समोर येते आहे. आता प्रफु्ल्ल पटेल यांच्या घरावरील EDची जप्ती उठली आहे. 

ED ने 2022 मध्ये पटेल यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान सात फ्लॅट्स जप्त केले होते. गॅंगस्टर इक्बाल मिर्ची याच्या पत्नीकडून ही प्रॉपर्टी पटेल यांनी बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप केला होता. सोमवारी याबाबत ईडीने ही मालमत्ता इक्बाल मिर्चीशी संबधित नसल्याचा दावा करत जप्ती रद्दी केली आहे. 

आरोप काय होते?

प्रफुल्ल पटेल यांच्या ज्या मालमत्तेवर कारवाई केली होती त्यातील दोन मजले  इक्बाल मिर्ची यांच्या कुटुंबियांचे होते. त्यांना ईडीने जप्त केले होते. ही मालमत्ता व्यावसायिक कामांसाठी उपयोगता होती. प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होता की, त्यांनी इक्बाल मिर्चीशी करार करुन ही संपत्ती खरेदी केली. ईडीच्या दाव्यानुसार हा करार 2007 मध्ये झाला होता. मात्र, आता ईडीने प्रफुल्ल पटेल यांची जप्त केलेली संपत्ती परत केली आहे. 

रोहित पवार काय म्हणाले?

प्रफुल्ल पटेल यांच्या घरावरील ED ची जप्ती उठली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भाजपसोबत गेल्यामुळे त्यात त्यांना यश आलं. पण लोकशाही वाचवण्यात यश आलं नाही, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. 

संजय राऊतांची टीका

माझी प्रॉपर्टी आहे ती कोणत्या गँगस्टरशी संबंधित नाही पण मी भारतीय जनता पार्टी सोबत गेलो नाही त्याच्यामुळे आमची प्रॉपर्टी जप्त केली. मला माझी प्रॉपर्टी सोडून घ्यायची असेल माझं राहतं घर बोलत आहे. मी जो पूर्ण व्यवहार लीगल आहे मग मला मोदी मोदी करावा लागेल. भाजपमध्येृ जावं लागेल पण मी जाणार नाही. Ed ,सीबीआय ही बीजेपी ची एक्सटेंडेड ब्रांच आहे प्रफुल पटेल यांना मंत्री म्हणायचं आहे. ज्यांच्या वरती अन्यायाची कारवाई दबावाची कारवाई केली आहे त्यांना देखील असाच न्याय मिळाला पाहिजे. सगळ्यांना एक न्याय मिळाला पाहिजे.