मुंबई : गेल्या १३ दिवसांपासून बंद असलेली मुंबई पुणे रेल्वेमार्ग उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. कर्जत ते लोणावळा दरम्यानच्या घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. शिवाय अनेक ठिकाणी रेल्वे रुळांखालील खडी वाहून गेली होती. दुरुस्तीच्या कामासाठी ३ ऑगस्टपासून कर्जत ते पुणे रेल्वेमार्ग बंद होती.
गेल्या १३ दिवसापासून मुंबई- पुणे रेल्वे सेवा ठप्प असून उद्या 16 ऑगस्टपासून पुन्हा रेल्वे मार्ग सुरु होणार आहे. मुंबई- पुणेतील घाट भागात दरड कोसळणे आणि काही ठिकाणी रुळाखालील वाळू वाहून गेल्याने पुणे मुंबई रेल्वे ३ ऑगस्ट पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द तर बहुतांश गाड्यांचे मार्ग बदलले होते. अखेर तब्बल १३ दिवसानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून उद्या पासून मुंबई - पुणे रेल्वे मार्ग पुन्हा सुरु होणार आहे.