Crime News : whatsapp status मुळे झाला हत्येचा उलगडा; पतीनेच केला पत्नीचा खून

या दोघाचं नुकतचं लग्न झाल होत. पण, अवघ्या काहीच दिवसात भयानक काही तरी घडलं. 

Updated: Feb 3, 2023, 08:09 PM IST
Crime News : whatsapp status मुळे झाला हत्येचा उलगडा; पतीनेच केला पत्नीचा खून

Crime News Virar :  whatsapp हे सध्या संपर्काचं प्रमुख माध्यम बनलं आहे. मात्र, याच whatsapp मुळे पोलिसांना मोठा पुरावा सापडला. whatsapp status मुळे हत्येचा उलगडा झाला आहे. विरार मध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली होती, कोणताही पुरावा नसता फक्त whatsapp च्या मध्यामतून पोलिसांनी आरोपीला पकडले आहे (Crime News Virar). 

विरारच्या कोपरी गावात एका महिलेच्या मृत्यूचं गूढ उकलल आहे. पतीनेच नवविवाहित पत्नीला गळा आवळून तिचा जीवा घेतला. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

विरारच्या कोपरी गावातील प्रियांका पाटील या नवविवाहीताचा तिच्याच घरात कुजलेल्या अवस्थेत मृदेह आढळला होता. विरार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. सदर महिलेचा मृत्यू हा गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्या नंतर पोलिसांनी तपास केल्या नंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

प्रियंकाचा पती बेरोजगार झाला होता. प्रियंका एका कंपनीत कामाला होती. तिथे तिचे एका तरुणासह अनैतिक संबंध असल्याच्या तिच्या पतीला संशय होता. याच संशयावरून तिच्या पतीने मित्राच्या मदतीने तिची हत्या करण्याचा कट रचला. प्रियकांची तिची गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली.प्रियकांच्या पतीने त्याच्या whatsapp status वरुन आई वडिलांनो मला माफ करा मी चुकीच पाउल उचलत असल्याचा मेसेज टाकला होता. या मेसेजवरून पोलिसांनी हा हत्येचा छडा लावला.

पोलिसांनी प्रियंकाच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. आपणच प्रियकांची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्याचा साथीदार फरार आहे. पोलिस त्याच्या फरार साथीदाराचा शोध घेत आहेत.