भोस्ते घाटातील स्वप्नातल्या मृतदेहाचं गूढ: सुरत, PUBG, गर्ल्डफ्रेंड, गोवा कनेक्शन?

Mysterious Dead Body Near Khed Bhoste Ghat: खेड रेल्वे स्थानकाजवळ मृतदेह असल्याचं स्वप्नात आल्याचा दावा तरुणाने केल्यानंतर खरोखरच जंगलामध्ये मृतदेह सापडल्याने गूढ वाढलं.

प्रणव पोळेकर | Updated: Sep 25, 2024, 12:14 PM IST
भोस्ते घाटातील स्वप्नातल्या मृतदेहाचं गूढ: सुरत, PUBG, गर्ल्डफ्रेंड, गोवा कनेक्शन? title=
भोस्ते घाटातील प्रकरणाचं गूढ वाढलं

Mysterious Dead Body Near Khed Bhoste Ghat: सावंतवाडीतील तरूणाला पडलेल्या स्वप्नामुळे खेड भोस्ते घाटातील मृतदेहाचा उलघड झाला. सर्वांनाच अचंबित करणारा हा प्रकार आहे. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीमध्ये तरूणांने सांगितलेला घटनाक्रम आणि वस्तुस्थितीमध्ये प्रचंड तफावत असल्याने हा सर्व बनाव असल्याचे म्हणणे आहे. मृताची ओळख पटण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. त्यामुळे संबंधित तरुणाची मानसोपचार तज्ज्ञाद्वारे तपासणी केली जाणार आहे. (या तरुणाने केलेल्या दाव्यानुसार पोलिसांना जंगलात नेमकं काय सापडलं येथे क्लिक करुन वाचा)

सुरतचा उल्लेख

या प्रकरणाच्या तपासासाठी 4 स्वतंत्र पथके काम करत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. योगेश पिंपळ आर्या (वय 30 वर्षे, रा. सावंतवाडी आजगांव) याला खेड भोस्ते घाटातील डोंगरात जंगलात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा, असे सांगत आहे. 17 सप्टेंबरला याबाबत आर्याने खेड पोलीस ठाण्यात तशी खबर दिली असून पोलिसांनी याची नोंद एफआयआरमध्ये सुद्धा केली आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. स्वप्नात आलेल्या त्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी आपण खेडमध्ये आलो. त्या दरम्यान त्यानं इन्स्टाग्रामवरही काही व्हिडिओ शेअर केले. त्यामध्ये त्यानं काही माहिती दिली. पोलिसांनी एकुणच त्याच्या प्रवासाबाबत आणि स्वप्नाबाबत विचारणा केली असता. आपण खेडमध्ये त्या मृतदेहाच्या शोधासाठी आलो होतो. परंतु मी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुद्धीत आलो, तर मी सुरतमध्ये होतो. तेथे काही फोटो काढले. त्यानंतर पुन्हा प्रवासात मला जेव्हा जाग आली तेव्हा खेड रेल्वे स्थानकाचा बोर्ड दिसला.

चार दिवस स्वत: शोधत होता मृतदेह

त्यानंतर खेडमध्ये उतरल्यावर मी चार दिवस मृतदेहाच्या शोधत असल्याचे योगेशने पोलिसांना सांगितले. त्याच्या जबाबत वारंवार होणार बदल आणि वस्तूस्थिती यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार बोगस असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी धडपड सुरू असून खेड, गोवा, सिंधुदुर्गमधील बेपत्ता झालेल्यांची पोलिस माहिती घेत आहेत. 

गर्लफ्रेण्ड अन् पब्जी कनेक्शनही चर्चेत

आर्या गोव्यात खासगी कंपनीत काम करत होता. मित्रांबरोबर तो गोव्यात राहत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी गोव्यातही त्याची चौकशी केली. तेव्हा एकतर्फी प्रेमातून त्याच्यावर काहीसा मानसिक परिणाम झाला होता. त्यामुळे त्या मुलीला प्रभावीत करण्याच्या दृष्टीने त्याने काही प्रकारही केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. तो सात दिवस गायब होता. तेव्हा त्या मुलीवर याचा काय परिणाम झाला असेल का, असे देखील तो मित्राला विचारत होता. त्यामुळे पोलिसांना आर्याचा मासोपचार तज्ज्ञाद्वारे तपासणी केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे स्वप्नाचे आणि जंगलातील मृतदेहाचे गूढ कायम आहे. आर्याला पब्जी गेम खेळण्याची सवय आहे. इन्स्टाग्रामवर टास्क संदर्भात काही व्हिडिओ त्याने शेअर केले आहेत. त्यामुळे हा टास्कचा एखादा प्रकार तरी नाही ना, याचा तपासही पोलिस करत आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x