Omicron | मुंबई-पुण्यानंतर आता या जिल्ह्यात आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण

  राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicron variant) हळूहळू हात पसरतोय.

Updated: Dec 12, 2021, 05:41 PM IST
Omicron | मुंबई-पुण्यानंतर आता या जिल्ह्यात आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन हळूहळू हात पसरतोय. डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबईनंतर आता विदर्भात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. नागपुरात ओमायक्रॉनचा पहिला (Omicron in Nagpur) रुग्ण आढळला आहे.ओमायक्रॉनबाधित रुग्णावर खबरदारी म्हणून खासगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांनी दिली आहे. (Nagpur 1st case found of  Omicron variant who 40 year old says Municipal Commissioner Radhakrishna B) 

नव्या विषाणूनची लागण झालेला रुग्ण 40 वर्षांचा आहे. या रुग्णाला प्रवासाचा इतिहास आहे. ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका असलेल्या दक्षिण आफ्रिकेतून ही व्यक्ती प्रवास करुन आली होती.

8 दिवसांपूर्वी ही व्यक्ती आफ्रिकेतून भारतात आली होती. तेव्हा या व्यक्तीची टेस्ट करण्यात आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ओमायक्रॉनची बाधा आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी या रुग्णाचे नमूने हे  'जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. रिपोर्टमध्ये रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं.

सुदैवाने आता या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच आणखी दिलासादायक बाब म्हणजेच रुग्णाच्या कुटुंबियांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आहे.