शाळा-महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही, 'हा' कठोर कायदा अंतिम टप्प्यात?

Nagpur Assembly : शाळा-महाविद्यालय परिसरात सर्रास गुटखा विक्री केली जाते. हा मुद्दा आज अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. यावर गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधा कठोर कायदा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी दिली.

राजीव कासले | Updated: Dec 13, 2023, 03:45 PM IST
शाळा-महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही, 'हा' कठोर कायदा अंतिम टप्प्यात? title=

Nagpur Assembly : राज्यात शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसराच्या आत सिगरेट-गुटखा (Gutkha Ban) विक्रीस कायद्याने बंदी आहे. पण अनेक ठिकाणई शाळांपासून शंभर मीटरच्या आतच तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री केली जात आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांच्या (School-College) बाजूलाच लहान दुकानं, चहाचे स्टॉल, पानटपरी आहे. यावर सिगारेट, बिडी, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची  विक्री होते. याकडे प्रशासनाची डोळेझाक होत असून अन्न आणि औषध प्रशासनाकडूनही (Food and Drug Administration) कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.

अधिवेनशात मुद्दा उपस्थित
हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. शाळा कॅालेज परीसरातील पान टपऱ्यांवरील गुटखा विक्रीबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शाळा कॅालेज परीसरात पान टपऱ्यांवर गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात जन्मठेपेचा कायदा अंतिम टप्प्यात असल्याचं बाबा आत्राम यांनी सांगितलं. शाळा कॅालेज परिसरात पान टपऱ्यांवर कारवाया होवून ही पुन्हा गुन्हा घडतो असं निदर्शनास आल्याने या कारवाईत गुन्हेगारांवर मोक्का लावण्याचा सरकार विचार करत आहे. तसंच शाळा कॅालेज परीसरात गुटखा विक्री बंदी व्हावी याकरता कायद्यात बदल करुन नॅान बेलेबल कायदा लागू करण्यावर देखील गंभीरतेने विचार करत आहे, अशी माहिती बाबा आत्राम यांनी दिली.

आममदार विक्रम काळे यांनी विधान परीषदेत शाळा कॅालेज परीसरात गुटखा तंबाखू विक्रीवर प्रश्न उपस्थित केला होता.  तर, पोलिस आणि सरकार गंभीर नसल्याने गल्लीत रोज नवीन ललित पाटील तयार होत असून त्यांना अभय मिळत आहे कारण कारवाई होण्याआधीच गुन्हेगारांना टीप लागते असा आरोप आमदार सचिन अहिर यांनी चर्चे दरम्यान केला. यावर उत्तर देताना शाळा कॅालेज परीसरात 100 मीटरच्या आत गुटखा तंबाखू विक्री बाबत गृहमंत्र्यांसोबत बैठक आयोजीत केली असून लवकरच सरकार याबाबत कठोर धोरण आणणार असल्याची माहिती बाबा आत्राम यांनी दिली.

ऑनलाईन गेमिंगच्या नादात राज्यात सात आत्महत्या
दरम्यान, अधिवेशनात तरुण पिढीत ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या व्यसनाबाबतही मुद्दा उपस्थित करण्यात आला. ऑनलाईन गेमिंगमध्ये सतत पैसे हरल्याने राज्यभरात 7 आत्महत्या तर 1 हत्येच्या घटना घडल्याची माहीती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. यात चंद्रपूर जिल्ह्यात 1 हत्या आणि 1 आत्महत्या, मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात 2 आत्महत्या, रायगड जिल्ह्यात 1 आत्महत्या, नाशिक ग्रामीणमध्ये 2 आत्महत्या, गोंदीया शहरात 1 आत्महत्येचं प्रकरण घजलं आहे. 

तसंच 2021 ते 2023 मध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 अन्वये 41 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. राज्यातील तरुण पिढीला ऑनलाईन रमी सर्कल, जंगली रमी, तीन पत्ती, ए. 23 सारख्या जाहिरातीमधून जुगार खेळण्यासाठीचे आवाहन करणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणण्याची मागणी तसंच त्याचा प्रसार प्रचार करणाऱ्या अभिनेत्री, अभिनेता आणि चॅनेलवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.