MBBS प्रवेश प्रक्रियेत कोर्टाचा मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

पदव्युत्तर मराठा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील मोठा दिलासा

Updated: Jun 13, 2019, 01:31 PM IST
MBBS प्रवेश प्रक्रियेत कोर्टाचा मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा title=

नागपूर : पदव्युत्तर मराठा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील राज्य सरकारच्या अध्यादेश विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कुठल्याही न्यायालयानं निर्णय देऊ नये असे निर्देश असल्यानं नागपूर खंडपीठानं याचिका फेटाळली आहे. प्रवेश प्रक्रियेत आधीच उशीर झाल्याचं देखील नमूद केलं आहे. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश संदर्भातील राज्य सरकारचा अध्यादेश तात्पुरता कायम आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून हा वाद सुरु होता. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं होतं. राज्य सरकारने हा वाद पाहता अध्यादेश काढला होता. कोर्टाच्या या निर्णयामुळे आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचं मराठा समाजाकडून स्वागत करण्यात आलं. सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.