वादळाचा मोठा तडाखा, नव्या पोलीस भवन इमारतीचे फॉल सिलिंग कोसळले

Nagpur Police Bhavan building : नागपूर येथील नव्या पोलीस भवन इमारतीला वादळाचा मोठा तडाखा बसला आहे.  

Updated: May 25, 2022, 10:02 AM IST
वादळाचा मोठा तडाखा, नव्या पोलीस भवन इमारतीचे फॉल सिलिंग कोसळले title=

नागपूर : Nagpur Police Bhavan building’s false ceiling collapses : येथील नव्या पोलीस भवन इमारतीला वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. इमारतीवर झाड कोसळल्याने काही कार्यालयातील फॉल सिलिंग कोसळले. नागपूर शहरातील नवीन पोलीस भवनात काल आलेल्या वादळामुळे इमारतीत काही कार्यालायातले फॉल सिलिंग कोसळले आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस भवनाचे उद्घाटन झाले होते. मात्र मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे नवीन इमारतीतील फॉल्स सेलिंग कोसळले.

उष्णतेमुळे लाहीलाही झालेल्या नागपूरला मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्याने चांगलंच झोडपलं. काही भागात पाऊसही कोसळला. अनेक भागात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विज पुरवठा सुरु खंडित झाला होता.तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती.  ग्रामीण भागाला कालचा वादळाचा चांगलाच तडाखा बसला. काल झालेल्या वादळी वाऱ्याचा तडाखा नुकत्याच उद्घाटन झालेल्या अद्ययावत अशा पोलीस भवनाच्या इमारतीलाही बसला.

हवेचा वेग इतका तीव्र होता की पोलीस भवनात इमारतीतील काही माळ्यांवरील फॉल्स सिलिंग कोसळली. या इमारतीत शहर पोलीस आयुक्त आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांसह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे कार्यालय आहे. एका भागात पोलीस आयुक्तालय आणि दुसऱ्या भागात ग्रामीण पोलीस अधीक्षक यांसह सर्व पर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे कार्यालय आहे. वादळीवाऱ्यानंतर अचानक फॉल सिलिंग इमारतीतल्या काही माळ्यावरील कार्यालयामध्ये कोसळल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मात्र एकच धावपळ उडाली होती.