'कौन बनेगा करोडपती 16'चा (Kaun Banega Crorepati Season 16) प्रोमो शेअर करण्यात आला असून, यावेळी शोमध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि शुजित सरकार (Shoojit Sircar) यांनी हजेरी लावली आहे. आपल्या आगामी I Want To Talk चित्रपटाच्या निमित्ताने दोघेही आले होते. दरम्यान यावेळी अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळाली. प्रोमोमध्ये अभिषेक बच्चन शोमध्ये मस्ती-मजा करताना दिसत आहे. तसंच जर आपण 7 कोटी जिंकलो तर काय करणार याबद्दल सांगितलं आहे.
अभिषेक बच्चनने यावेळी आपल्या घरातील काही खुलासे केले. डिनर टेबलवर सर्वजण असताना एका परंपरेचं पालन केलं जात असंही त्याने सांगितलं. "डिनर टेबलवर जर एखाद्याने प्रश्न विचारला आणि समोरच्या व्यक्तीने योग्य उत्तर दिलं तर सर्व कुटुंब एकत्र ओरडतं 7 करोड," असा खुलासा अभिषेक बच्चनने केला. तसंच जोपर्यंत आपण 7 कोटी जिंकत नाही तोपर्यंत आपण हा शो सोडणार नाही असंही त्याने विनोदाने म्हटलं. अभिषेकची मस्ती पाहून अमिताभ यांनीही याला शोमध्ये बोलवून चूक केली असं म्हटलं.
बक्षिसाच्या रकमेचं काय करणार? असं विचारलं असता अभिषेकने दिलेल्या उत्तरानंतर एकच हशा पिकला. “जर आम्ही 7 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली, तर मी जाहीर करतो की पुढील दोन दिवस शूटिंग होणार नाही. आम्ही सगळे सुट्टीसाठी गोव्याला जात आहोत,” असं अभिषेक बच्चनने जाहीर करुन टाकलं. दुसरीकडे लेखक अर्जुन सेन यांनी खुलासा केला की तो एअर फोर्स वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन (एएफडब्ल्यूडब्ल्यूए) साठी खेळणार आआणि दिग्दर्शक शूजित सिरकार यांनी चांगली रक्कम मिळाल्यास भटक्या कुत्र्यांसाठी समर्पित असलेल्या मनाली स्ट्रेस या एनजीओला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली.
अभिषेक शेवटचा मोठ्या पडद्यावर आर. बाल्की यांच्या घूमर चित्रपटात दिसला होता. शूजित सरकार दिग्दर्शित त्यांचा पुढील चित्रपट 'आय वॉन्ट टू टॉक' त्याच्या व्यक्तिरेखेच्या विलक्षण प्रवासाचा शोध घेईल, जो जीवनावरील एका अनोख्या दृष्टीकोनातून आव्हानांवर मात करतो. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिषेक आणि शुजित सरकार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत पिकू आणि पिंक या चित्रपटात आधी काम केलं आहे.