नागपूर : नागपूरच्या सुप्रसिद्ध पंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये इडली सांबारमध्ये अळ्या आढळल्यात. विशेष म्हणजे 'बिग बी' अमिताभ बच्चन झुंड सिनेमाच्या चित्रीकरणासाठी याच हॉटेलमध्ये थांबलेत. १४ आणि १५ डिसेंबर रोजी एका फार्मा कंपनीच्या या हॉटेलमध्ये बैठक होती. त्यावेळी देण्यात आलेल्या न्याहरीत अळ्या आढल्याने फार्मा कंपनीने हॉटेल प्रशासनाला कळवले होते. मात्र दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार घडला.
हा प्रकार समोर आल्यानंतर समाजातून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या असून राजकीय संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. शिवसेना युवासेनेने शनिवारी एफडीएकडे तक्रार दिली.
शनिवारी रात्री एफडीएच्या चमूने हॉटेलमध्ये जाऊन चौकशी करत खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे नमुने घेतले. आता या सगळ्या प्रकरणी अहवाल आल्यावर एफडीए काय कारवाई करणार याकडं नजरा लागल्या आहेत.